मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. वानखेडे कुटुंबानंतर नवाब मलिकांनी भाजपाच्या नेत्यांवर देखील ड्रग्ज संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्जच्या व्यवसायत सहभाग असल्याचे नवाब मलिक म्हणाले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपाला नवाब मलिक देखील उत्तर देणार आहेत. त्यासाठी नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे.
आ रहा हूँ मैं
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 9, 2021
नवाब मलिक यांनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी ट्वीट करत “आ रहा हूँ मैं”, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता मलिक फडणवीसांच्या आरोपाला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्याने तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत.