मुंबई – बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा या कपलची कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चा रंगलेली असते. अनेकदा ते दोघे एकत्र फिरताना दिसतात. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून अनेक फोटो ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आज (दि. 26) अर्जुन कपूरचा 38 वा वाढदिवस असून, याच निमित्ताने काल रात्री अर्जुनच्या घरी प्री-बर्थडे सेलिब्रेशन पार्टी मोठ्या थाटात पार पडली.
अर्जुन कपूरच्या बहिणी अंशुला आणि खुशी कपूर व्यतिरिक्त त्याची गर्लफ्रेंड ‘मलायका अरोरा’ही यावेळी दिसली. या सेलिब्रेशन नाईटची झलक आता समोर आली असून, अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमध्ये मलायका अरोराचा डान्स पाहायला मिळत आहे. पार्टीत मलायकाने जोरदार डान्स केला आहे.
यावेळी मलायका एका ऑफ-व्हाइट गाऊनमध्ये दिसली ज्यावर लाल हार्ट बनवलं होतं. व्हायरल होत असलेल्या मलायकाच्या व्हिडिओमध्ये ती पूर्णपणे डान्समध्ये मग्न झालेली दिसत आहे. मलायकाने यावेळी तिच्याच प्रसिद्ध ‘छैया छैया’ गाण्यावर डान्स केला, ज्यामध्ये तिने जोरदार ठुमके लगावले आहेत. सध्या तिचा हा व्हिडिओ सगळीकडे तुफान व्हायरल असून, नेटकरी देखील यावर कमेंटचा भडीमार करत आहे.