मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ती सोहळा मीडियावर नेहमीच हटके अंदाजात फोटो शेअर करत असते.
काही वेळा सोशल मीडियावर तिचे फॅन्स तिच्या फोटोवर कंमेंट्स करत कौतकाच वर्षाव करतात तर काही वेळा ट्रोलिंग सुद्धा केली जाते. यातच पुन्हा एकदा तिच्या ड्रेसिंग स्टाईलवर सोशल मीडिया युजर्सने चांगलीच ट्रोलिंग केली आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका जीममध्ये जाताना दिसत आहे. मात्र तिच्या जीम आउटफिट्सचा कलर तिच्या स्किन कलरशी एवढा मिळता जुळता आहे की त्यामुळे सर्वच संभ्रमात आहे. याच लुकवरुन मलायकाला सध्या जोरदार ट्रोल केलं जात आहे.
मलायकाच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगली चर्चा होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींना हा जिम आऊटफीट आवडला आहे तर काहींनी या आऊटफीटसाठी नाक मुरडली आहेत. असा विचित्र जीम आऊटफिट याअगोदर कधीच न पाहिल्याचं देखील सांगण्यात येतंय.