मलायकाची तुलना श्रीदेवीशी नको; अर्जुन कपूर भडकला

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्यातील अंतर दिवसेंदिवस कमी होते आहे. आता दोघेही एकमेकांच्या घरात मुक्‍तपणे वावरत असतात. अर्जुनच्या बहिणींबरोबर मलायका काही वेळेस सिनेमा बघायला जाते, तर काही वेळेस पार्टीलाही जाते. मात्र का कोणास ठाऊन नेटिझन्सना यातून काहीतरी वेगळाच अर्थ काढावासा वाटला. एका युजरने मलायकाची तुलना श्रीदेवीशी केली. पण या तुलनेमुळे अर्जुन कपूर चांगलाच भडकला. त्याने या युजरला चांगलेच झापले आहे.

खरे तर ही नेट युजर अर्जुन कपूरची फॅन आहे. नेटवर तिचे नाव कुसुम आहे. तिने अर्जुन कपूरला उद्देशून हे ट्विट केले. “तू तुझ्या वडिलांच्या (बोनी कपूर) दुससऱ्या पत्नीचा द्वेष करत होतास. कारण त्यांनी एका ऍक्‍ट्रेससाठी आपल्या पत्नीला सोडून दिले होते. आता तू तुझ्या वयापेक्षा तब्बल 11 वर्षांनी मोठ्या महिलेला डेट करतो आहेस. त्या महिलेला एक टीनएज्ड मुलगाही आहे. असे डबल स्टॅन्डर्ड कशासाठी अर्जुन ?’ असे या युजरने विचारले होते.

यावर अर्जुनने या कुसुमला चांगलेच फैलावर घेतले. “मी कोणाचाही द्वेष करत नाही. आम्ही एकमेकांपासून सन्मानपूर्व अंतर कायम ठेवले होते. जर मी श्रीदेवीचा द्वेष करत असतो. तर त्या गेल्या तेंव्हा मी माझ्या वडिलांबरोबर, जान्हवी आणि खुषीबरोबर उभाही राहिलो नसतो.’ असे अर्जुनने रिप्लायमध्ये म्हटले आहे. कोणताही विचार न करता जज करणे सोपे असते. तू वरुण धवनची फॅन आहेस. त्यामुळे त्याच्या नावावर अशी नकारात्मकता पसरवू नकोस, अशा शब्दात त्याने या कुसुमला सुनावले आहे. यावर या युजरने माफी मागितली आणि आपले ट्विट डिलीटही केले आहे. मलायका अरोराबाबत आपल्या मनात काहीही राग नसल्याचेही तिने स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.