मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत. अनेकदा मलायकाला पाहून तिचे फॅन्स तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धावून जातात. अशाच सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅन्सवर मलायका भडकल्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
झालं असं मलायका आपल्या प्रवासासाठी एरपोर्टवर दाखल झाली होती. काही फॅन्सने दिला पाहिले आणि उतावीळपणे ते सेल्फी घेण्यासाठी धावले. यादरम्यान अनेकांचा मलायकाला धक्का लागला. यामुळे अभिनेत्री देखील अनकंफर्टेबल झाली. यावेळी तिने “जरा आराम से…” म्हणत फॅन्स सुनावले देखील. मुंबई विमानतळावरील घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शो मुळे मलायका चांगलीच चर्चेत आली होती. मलायकाला नेहमीच हटके काहीतरी करण्याची सवय आहे. मलायका नेहमी आपला वेगळा रुबाब सर्वांना दाखवून देत असते. या शोमध्ये देखील मलायका काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केला होता. मॉडेलिंग आणि अभिनयासोबत मलायका तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते.