Malaika Arora – मलायका अरोरा (Malaika Arora) ही बी टाऊनची फॅशन क्वीन मानली जाते. तिचा स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्ससोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते. मलायका अरोराची (Malaika Arora) चमकणारी त्वचा पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. पुन्हा एकदा अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक सोशलवर धुमाकूळ घालत आहे.
फॅशन क्वीन मलायका अरोराच्या (Malaika Arora) लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री नुकतीच लाल रंगाच्या स्लिट साडीच्या ड्रेसमध्ये दिसली. या स्टायलिश साडीसोबत अभिनेत्रीने सिक्वेन्स वर्क ब्लाउज घातला होता. डिप नेक आणि स्लिव्हर स्टोन ज्वेलरीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. मलायका अरोराचा हा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.
View this post on Instagram
मलायका अरोराचा हा बोल्ड आणि सुंदर व्हिडिओ पापाराझीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर व्हायरल केला आहे. मलायका अरोराने रेड कलरच्या स्लिट साडीसोबत हलका मेकअप केला आहे. मलायका अरोरा मोकळ्या केसांनी खूपच सुंदर दिसत आहे. फॅशन तिच्या या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव करत आहेत.