मंबई – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, नुकतंच त्याचा “तू झूठी मै मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर सोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्यभूमीकेत दिसून आली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेरसिकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात त्याचा अतिशय दमदार आणि हँडसम लूक दिसून आला आहे. रणबीर हा त्याच्या फिटनेससाठी देखील खास ओळखला जातो.
दरम्यान, नुकतंच सोशल मीडियावर रणबीर कपूरचे काही फोटो व्हायरल झाले असून, यामध्ये अभिनेत्याची पिळदार शरीरयष्टी पाहून त्याचे चाहते भारावून गेले. आगामी चित्रपट ॲनिमलसाठी रणबीर कपूरने पिळदार शरीरयष्टी बनवली आहे. यासाठी तो खूप मेहनत घेत असून, त्यासाठी तो खास डाएटही फॉलो करत आहे. रणबीरने आपल्या ट्रांन्सफॉर्मेशनसाठी खूप मेहनत घेतली आहे.
रणबीरचा फिटनेस ट्रेनर शिवोहमने सांगितले की, रणबीर आपल्या पिळदार शरीरयष्टीसाठी प्रचंड मेहनत घेतो. रणबीर तेल आणि मसाल्याचे पदार्थ खाण्यापासून दूर राहतो. तो आपला डाएट इतका फॉलो करतो की, गेल्या अडीच वर्षात त्याने गव्हाची चपाती खाल्लेली नाही. तो लो-कार्बो डाएट फॉलो करतो. ज्यात अंडे, ब्राउन राइस, भाज्या, डाळी, प्रोटीन शेक यांचा समावेश आहे. असं शिवोहमने सांगितले आहे.