मुंबई – 49 वर्षांची ‘मलायका अरोरा’ (malaika arora) जेव्हा-जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती तिच्या सौंदर्याची अशी जादू निर्माण करते की चाहते बेभान होऊन जातात. यावेळीही असाच काहीसा प्रकार मलायका अरोराने (malaika arora) केल्याचं पाहायला मिळालं. आजकाल मलायका सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात आपल्या बोल्ड लूकने फॅन्सला वेड लावताना दिसत आहे.
नुकताच मलायका अरोरा ही एक पुरस्कार सोहळ्यात पोहचली. यावेळी मलायका अरोरा हिचा जबरदस्त असा लूक दिसला. मलायका अरोरा हिच्या लूककडे पुरस्कार सोहळ्यातील लोकांच्या नजरा दिसल्या. मलायका अरोरा हिने पांढऱ्या रंगाची जबरदस्त अशी साडी घातली. खास मेकअप आणि ज्वेलरी देखील या लूकसोबत तिने कॅरी केली होती.
View this post on Instagram
या लूकमध्ये अभिनेत्री कमालीची हॉट आणि ग्लॅमर्स दिसत होती. मलायका अरोरा हिने या लूकमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, मलायकाचे हे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. 49 वर्षांची ही अभिनेत्री अजूनही 24 वर्षांच्या मुलींपेक्षा सुंदर दिसते. म्हणूच सोशल मीडियावर अभिनेत्रीचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे.