‘फोन पे’चे पोस्टर मराठीत करा; मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा

कोथरूड – शहरात इतर भाषेत असलेले “फोन पे’ चे पोस्टर मराठी भाषेत करावे. येत्या पंधरा दिवसात हा बदल करावा, अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे शहर विभागाकडून देण्यात आले. 

यावेळी उपविभाग अध्यक्ष रमेश उभे, अनिकेत मुरकुटे, अशोक दळवी, शाखा अध्यक्ष अभिजीत चौगुले, गणेश चव्हाण, माऊली मोरे यांनी “फोन पे’चे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले.

यावेळी अमराठीत असलेले फोन पे चे पन्नास हजार स्टिकरची होळी करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.