राजगुरूनगर : जोराच्या वादळी वाऱ्यामुळे पाळू ता. खेड येथिल पांडुरंग नारायण गायकवाड यांच्या घराचे घराचे छपर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे तर हे छप्पर शेजारच्या घरावरती पडल्यामुळे शेजारच्या कौलारू घराचेही नुकसान झाले आहे.
तालुक्यात आज सकाळी पासून तुरळक पाऊस आणि हलकेसे वादळ सुरू झाले दुपारी बारानंतर त्यात वाढ होत गेली आणि वादळाची तीव्रता वाढली. पावसाचे प्रमाणही वाढत गेले. सोसाट्याचा वारा सुटला. वाऱ्याची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे होती. चक्रीवादळ नसल्याने अनेक घरे झाडे आतापर्यंत वाचली आहेत. आतापर्यंत या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांची छपरे उडाली आहेत.
रस्त्यांवर झाडे पडली आहेत. विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुपारी तीन नंतर वादळाची व पावसाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यात सर्वाधिक नुकसान घरांचे झाले आहे त्यातही पत्रे असलेली घरकुले, शाळा आणि अंगणवाड्या यांचा समावेश जास्त आहे. पाईट, वाडा परिसरात वादळाची तीव्रता मोठी असल्याने झाडे कोसळली आहेत. एकूणच तालुक्यात या वादळाने मोठे नुकसान होत आहे.
पाळू येथील पांडुरंग गायकवाड या व्यक्तीच्या रमाई आवास योजनेतून बांधण्यात आलेल्या घराचे छप्पर उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे