पावसाळ्यात अनेकजण आरोग्याची काळजी घेताना दिसतात पण ते पायांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. पावसाळ्यात ऋतूबदलामुळे आपल्या आरोग्यासह पायांची काळजी देखील घ्यावी. कारण पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे तुमच्या पायांचे सौंदर्य कमी होऊ शकते. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचलेले असते त्यामुळे साचलेल्या पाण्यातून, चिखलातून बऱ्याचदा चालावे लागते. ट्रेन, लोकल, बसच्या गर्दीच्या प्रवासात पाय ओले व घाण होतात त्यामुळे इन्फेकशनचा धोका वाढतो.
बाहेरून घरी आल्यावर पाय व्यवस्थित धुऊन पाय कोरडे करून अँटी फंगल पावडर लावावी. त्वचा व्यवस्थित स्वच्छ केल्याने फंगस इन्फेक्शन होण्याचा धोका टळतो. जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात 10 मिनिटे पाय बुडवून ठेवावेत. पावसाळ्यात पेडिक्युअर करणेही पायांच्या सौंदर्यासाठी फायदेशीर ठरते.
पावसाळी सॅंडल्स फार घट्ट किंवा कडक वापरू नये. बंद प्रकारातले किंवा पावलाखाली, बोटांजवळ पाणी साचवून ठेवणारे सॅंडल्ससुद्धा वापरू नका, यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. प्रवासात किंवा ऑफिसमध्ये संधी मिळताच सॅंडल्स थोडावेळ काढून ठेवावी. पावलांना कोरडे होऊ द्यावे. सॅंडल्सही कोरड्या कराव्यात. अशा काही साध्या बाबी लक्षात घेतल्यास पायाचे सौंदर्य पावसाळ्यातही टिकून राहते.