चंद्रपूर येथे हत्तीच्या हल्ल्यात माहुताचा मृत्यू

चंद्रपूर- ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका हत्तीच्या हल्ल्यात माहुताचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जानकीराम मसराम (वय 45 वर्ष) या घटनेत मृत्यू झालेल्या माहुताचे नाव आहे. या घटनेमुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मोहुर्ली येथे घडली.

चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारी आणि इतर कामासाठी काही हत्ती मोहर्ली येथील कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. मागील काही दिवसांत या हत्तीवरुन सफारी केली जायची. सद्यस्थितीत एका मादी हत्तीला एक वर्षाचे पिल्लू असून, दुसरी मादी हत्ती गरोदर आहे.

या काळात मादी हत्ती ही नर हत्तीला जवळ येऊ देत नाही. त्यामुळे गजराज नावाचा नर हत्ती बिथरला असावा, असे मत व्यक्त केले जात आहे.

शनिवारी दुपारी अचानक अमोल यांच्यावर हत्ती चाल करुन गेला. माहुती जानकीराम मसराम हे अमोल यांना वाचविण्याच्या प्रयत्नात असताना हत्तीने त्यांना सोंडेत पकडून जमिनीवर आदळले. त्यानंतर त्यांना पायदळी देखील तुडवले. यामुळे मसराम यांचा जागीच मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.