नवी दिल्ली – करोना रुग्णांवरील एलोपॅथी उपचारांबाबत योगगुरू रामदेव बाबा यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर IMA ने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
“Arrest to kisi ka baap bhi nahin kar sakta Swami Ramdev ko.”
Sach kahan aapne, Ramkrishna Yadav.
Bhai aur Baap toh Opposition ko arrest karne mein busy hai.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) May 27, 2021
सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली.
आता त्यांचा पुन्हा एक व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
त्यामध्ये, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटल होत. त्यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या बाबा रामदेव यांच्यावर चांगल्याच संतापल्या आहे. मोदी आणि शाह यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी बाबा रामदेव यांना सुनावलं.
नेमकं काय म्हणाल्या महुआ मोईत्रा
“स्वामी रामदेवला कुणाचा बापही अटक करू शकत नाही. कारण रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत,” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी बाबा रामदेव यांना प्रत्युत्तर दिलं.