पवनानगर, (वार्ताहर) – ब्राम्हणोली पुलाच्या शेजारील पवनाधरण नदीच्या पात्रात एक महिंद्रा थार गाडी बुडाल्याची घटना बुधवार (दि. २७) सायंकाळी ५ च्या सुमारास घडली आहे. मात्र यात कोणतेही जिवीत हानी झाली नाही.
पुलाच्या शेजारील नदीपात्रात येणार पर्यटक व नागरिक आपली वाहने धुवत असतात. वाहने धुवताना या ठिकाणी अशा अनेक घटना घडल्या आहे. मात्र, या ठिकाणी वाहने धुवणारे व पर्यटकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल उपस्थित होते आहे. तसेच अशा हुल्लडबाज पर्यटकांवर व त्या ठिकाणी वाहने धुवणाणाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करावी, तसेच या ठिकाणी सूचना फलक लावावे ,अशी मागणी परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली आहे.