पुणे – महाराष्ट्रातील मल्टिस्टेट क्षेत्रात अग्रमानांकित अशी ओळख असलेली संस्था महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पुणे या संस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा हेमा मंगल कार्यालय, पुणे येथे संस्थेचे उपाध्यक्ष प्रविण बांगड यांच्या सभा अध्यक्षतेखाली शांततेने व उत्साहपुर्वक वातावरणात संपन्न झाली.
यावेळी संस्थेचे सचिव/संचालक मगराज राठी यांनी संस्थेच्या 31 मार्च 2023 वार्षिक ताळेबंद विषयी माहिती सभेला देताना संस्थेची एकुण ठेवी 168 कोटी व एकुण कर्ज वाटप 98 कोटी संस्थेचा निव्वळ नफा 1 कोटी 45 लाख झालेला आहे तसेच तरलते पोटी संस्थेनी 78 कोटीची गुंतवणूक केलेली आहे.
संस्थेने यावर्षी 11% लाभांश सभासदांना वाटप करण्याचे ठरविले आहे. यासभेला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांना संस्थेतर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व तसेच संस्थेच्या सेवकवर्ग व दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या 25 वर्षाच्या कामकाजाचे कौतुक केले.
संस्थेच्या 25 वर्षाच्या सभेत काही महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले, संस्थेचे मुख्य कार्यालय स्थलांतर विषय व तसेच संस्थेच्या नवीन शाखा सुरूवात करण्याविषयी माहिती सभेला देण्यात आली. सभेत चंद्रयान-3, आदित्य-1 या मोहिम यशस्वी करणाऱ्या शास्त्रांचा अभिनंदन ठराव संस्थेतर्फे मंजुर करण्यात आला व तसेच विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यासभेत संस्थेचे कार्यकारी संचालक राजेश राठी यांची संस्थेच्या अध्यक्ष पदी व मगराज राठी यांची संस्थेच्या कार्यकारी संचालक व उएज-मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली त्याला सर्व संचालक मंडळाने मान्यता दिली.
यासभेस जवळपास 600 सभासद खातेदार ठेवीदार हितचिंतक यांच्या उपस्थितीत 25 वी रौप्य महोत्सवी सभा यशस्वी संपन्न झाली. या सभेचे सभा अध्यक्ष मा.श्री. प्रविण बांगड यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून सभा संपल्याचे जाहिर केले.