मुंबई – साऊथ स्टार नरेश सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. नरेश हा अभिनेता महेश बाबूचा सावत्र भाऊ असून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत तो रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा देखील सुरु होत्या. आता लवकरच दोघेही लग्नाच्या बेडीत अडणार असल्याचं बोललं जातंय. नरेशने एक व्हिडीओ शेअर करत याबाबत सूतोवाच केला आहे.
नरेश बाबूने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच रोमँटिक आहे. नवीन वर्ष नवीन सुरुवात असं कॅप्शन यावेळी त्याने दिले आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत पवित्रा लोकेश देखील असल्याचे दिसते. तसेच व्हिडिओमध्ये मेणबत्ती आणि केकणे सजवलेला टेबल देखील पाहायला मिळतो. खिडकीच्या बाहेर जोरदार आतिषबाजी सुरु असताना नरेश आणि पवित्रा एकमेकांना लिपलॉक किस करताना दिसत आहेत. त्यासोबतच गेटिंग मॅरीड सून असं देखील या व्हिडिओमध्ये म्हंटल आहे.
New Year ✨
New Beginnings 💖
Need all your blessings 🙏From us to all of you #HappyNewYear ❤️
– Mee #PavitraNaresh pic.twitter.com/JiEbWY4qTQ
— H.E Dr Naresh VK actor (@ItsActorNaresh) December 31, 2022
नरेश बाबूने तेलगू सिनेमांमध्ये आपल्या लहान वयातच अभिनयाला सुरुवात केली होती. परंतु तो आपल्या अभिनयाऐवजी खाजगी आयुष्यातील नात्यांमुळेच चर्चेत राहिला आहे. या आधी नरेशचे तीन विवाह झाले असून आता तो चौथ्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे पवित्रा लोकेशचा देखील हा दुसरा विवाह असणार आहे. चाहत्यांना या व्हिडिओवर कॉमेंट करत दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.