World Cup 2023 NZ vs SL Match Maheesh Theekshana Record : विश्वचषकाच्या 41व्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पाच विकेट राखून पराभव केला. स्पर्धेतील हा त्याचा पाचवा विजय असून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा त्याने जिवंत ठेवल्या आहेत तर या स्पर्धेत श्रीलंकेचा प्रवास आधीच संपला आहे.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 171 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 23.1 षटकात 5 विकेट गमावत 172 धावा करत सामना जिंकला.
New Zealand won by 5 wickets in Bengaluru. #SLvNZ #CWC23 pic.twitter.com/LsQuVLE1Ii
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) November 9, 2023
दरम्यान, या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेचा खेळाडू महिष तिक्ष्णा हा 91 चेंडूत 38 धावा करून नाबाद परतला. यासह महिष तिक्ष्णाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
खरं तर, एकदिवसीय विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात 9व्या क्रमांकापासून ते 11व्या क्रमांकापर्यंतच्या फलंदाजाने 91 चेंडूंचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशाप्रकारे महिष तिक्ष्णा हा विश्वचषकाच्या इतिहासात 91 चेंडूंचा सामना करणारा पहिला क्रमांक नऊचा फलंदाज ठरला आहे.