ऐन सणासुदीच्या काळात नगरकरांना राहावे लागणार आंधारात
नगर (प्रतिनिधी) – महावितरण मध्ये सुरक्षारक्ष म्हणून कार्यरत असलेले माजी सैनिक सुदाम आढाव यांची कुठले ही कारण न देता प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांची नियुक्ती दिल्याचे ठिकान सोडून इतरत्र बदली करण्यात यावी अन्यथा मंगळवार पासून महावितरणचे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटनेने दिला आहे.
अधिकार्याचा मनमाणी कारभाराचा कळस
संबंधित कार्यकारी अभियंता यांनी 9 सप्टेंबर रोजी बदली आदेश काढल्यानंतर माजी सैनिक असलेल्या आढाव यांना झालेल्या बदली बाबत कोणतीही कल्पना न देता त्यांच्या घराच्या दरवाज्यावर, तसेच नगर सर्कलच्या गेटवरील पहारेकरी यांच्या कॅबीनच्या दरवाज्यावर बदलीचा आदेश लावून अधिकार्यानी मनमाणी कारभाराचा कळस केला आहे. त्यांची अवहेलना केली. या बदलीचे पत्र हे त्यांना सन्मानाने द्यायला पाहिजे होते. मात्र, महावितरण महामंडळाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे कंपनीचे सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार असल्याचे तांत्रीक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ लाढ यांनी सांगितले
महावितरण विभागाच्या नगर मंडळ कार्यालयाततील माजी सैनिक सुदाम आढाव हे कायम पहारेकरी म्हणून कार्यरत आहे. शहर तथा ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता बदली कालावधी संपलेला असताना मनमानी पद्धतीने प्रशासकीय बदली केली. या मनमाणी धोरणाचा महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्यावतीने निषेध करत माजी सैनिकावर होणारा अन्याया विरोधात मंगळवार आवाज उठवणार आहेत.
संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याकडून इतर दोनही पहारेकरी यांना त्यांच्या विनंतीनुसार बदली करण्यात आली. मात्र, सुदाम आढाव याना भिस्तबाग येथील कचरा डेपो या ठिकाणी त्यांची प्रशासकीय बदली केली. त्यांना दमा, मधूमेह व रक्तदाबाच्या आजाराने त्रस्त आहेत. याबाब त्यांनी सौनिकी रुग्णालयाचे कागद पत्रे ही संबंधीत अधिकारी यांना दाखवली.
मात्र, हे कागदपत्रे खोटे असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. शहरात 10 उपकेंद्र असून 7 ठिकाणी जागा रिक्त आहेत. इतरत्र कोठे ही बदली द्यावी. असे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे प्रविण जठार, सतीश भुजवळ, शंकर जारकड यांनी म्हटले आहे. अन्यथा 1 ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.