शिरूर – करोनाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरासह तालुक्यात डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठीशिवाय कोणालाही ताप, खोकल्याचे कोणतेही औषध देऊ नये, अन्यथा त्या मेडिकल दुकानदारावर आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी दिली.
शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी या आदेशाची अंबलबजावणी आपल्या स्तरावर करावी यासाठी त्यांना तहसीलदार लैला शेख यांच्यावतीने पत्र देण्यात आले आहे.