अणे (ता. जुन्नर) : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पठारभागात वादळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे.
वर्षभराची पुंजी खरिपावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी आस लावून काळ्या मातीत बैलाच्या सहाय्याने बीजारोपण करीत आहे. सध्या पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू असल्यामुळे पूर्व भागातील शिवारे गजबजली आहेत.