Arun Kadam – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सर्वच कलाकार आपल्या दमादार विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांची संपूर्ण महाराष्ट्रात क्रेझ पाहायला मिळते. मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ चा भाग असलेला विनोदवीर अभिनेते अरुण कदम यांच्या बाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
प्रेक्षकांचे लाडके दादूस यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. अरुण कदम यांचे सगळे फोटो या हॅकरने डिलीट करून अकाऊंटवर स्वत:चे वेगळे फोटो शेअर केले आहेत.
इंस्टाग्रामवर अभिनेते अरुण कदम यांचे लाखोंच्या घरात चाहते आहे. त्यांना सोशल मीडियावरही दादूस नावाने चाहते ओळखतात. इंस्टाग्रामवर दादूस हे सक्रिय आहे. ते नेहमीच त्यांच्या लाईफचे अपडेट सोशलवर शेअर करत असतात. दादूस सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर संपर्कात राहतात अशात दादूस यांचे अकाउंट हॅक झाल्यामुळे चाहत्यांना धक्काच बसला आहे.
दादूस यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या नातवाचे फोटो आणि त्याच्या नामकरण सोहळ्यातील काही क्षण त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. परंतु, हे सगळे फोटो डिलीट करून हॅकरने त्यांच्या अकाऊंटचा संपूर्णपणे ताबा मिळवला आहे. तसेच या ब्लू टिक असलेल्या अकाऊंटवर स्वत:चे फोटो शेअर केले आहेत. अरुण कदम यांनी अद्याप याबाबत कोणंतही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
महाराष्ट्राचा लाडका दादूस यांचे अकाउंट हॅक झाल्यामुळे चाहते सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत आहे.