पुणे : पुणे – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशीपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागात ९२ किलो गटात सोलापूरच्या शुभम चव्हाणने सुवर्णपदक पटकावले.
म्हाळुंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत माती विभागातील ९२ किलो गटात अंतिम लढतीत शुभम चव्हाण याने साता-याच्या जयदीप गायकवाडवर ८-० ने मात करत सुवर्णपदक मिळवले.
अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने जयदीप गायकवाडला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं तर बीडच्या अमोल मुंडेने कांस्यपदक पटकावले.