पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशीपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागात ७० किलो गटात सोलापूर जिल्ह्याच्या कालीचरण सोलनकर याने सुवर्णपदक पटकावले.
म्हाळुंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत गादी विभागातील ७० किलो गटात अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या कालीचरण सोलनकर याने पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीवर ६-५ ने सहज विजय मिळवला. त्यामुळे दिनेश मोकाशीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
याशिवाय या गटात अहमदनगरच्या विकास गोरे आणि पिंपरी चिंचवडच्या योगेश्वर तापकिरने ब्राँझपदक पदकावले.