Maharashtra Sadan Scam | Chhagan Bhujbal – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून उद्या सुनावणी होणार आहे. यामुळे नाशिक लोकसभेची तयारी करणाऱ्या छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ।Maharashtra Sadan Scam | Chhagan Bhujbal
महाराष्ट्र सदन घोटाळा :
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना डिसचार्ज करण्यात आल होतं. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दिड वर्ष ऐकले जात नव्हते. ५ न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP करुन त्यावर ओरडी घेऊन, माननीय CJ… pic.twitter.com/mmaa8ELJjI
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 31, 2024
याबाबत अंजली दमानिया यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना निर्दोष सोडण्यात आले होते. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दीड वर्ष ऐकले जात नव्हते. पाच न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयासमोर एक एसएलपी करून त्यावर ओरडी घेऊन, माननीय सरन्ययाधीश यांना योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले आहेत. शेवटी प्रकरण उद्या अनुक्रमांक १२ वर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात आले आहे. ।Maharashtra Sadan Scam | Chhagan Bhujbal