Mamata Banerjee On Narendra Modi – भाजपने लोकसभानिवडणुकीत चारशे जागा जिंकण्याच्या वल्गना केल्या आहेत, पण त्यांनी या निवडणुकीत दोनशे जागांचा आकडा पार करून दाखवावा, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला दिले आहे.
पश्चिम बंगालमध्ये सीएए कायदा लागू करू दिला जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. कृष्णनगर मतदारसंघात तृणमुल कॉंग्रेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. । Mamata Banerjee On Narendra Modi
त्या म्हणाल्या की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने २०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु त्यांना ७७ वर थांबावे लागले. या ७७ पैकीही काहीजण आमच्यात दाखल झाले आहेत.
भाजपही ‘जुमला’ पार्टी आहे असे नमूद करून ममतांनी सीएएवर मोदींनी दिलेली हमी कुचकामी आहे, असे म्हटले आहे. सीएए हा कायदेशीर नागरिकांना परदेशी बनवण्याचा सापळा आहे. एकदा तुम्ही सीएए लागू केल्यानंतर एनआरसीही लागू करावी लागेल.
आम्ही पश्चिम बंगालमध्ये सीएए किंवा एनआरसीला परवानगी देणार नाही. केंद्र सरकारच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीनंतर आपला पक्ष इंडिया आघाडीबरोबर काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. । Mamata Banerjee On Narendra Modi