पुणे : कुस्ती क्षेत्रात मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी येत्या सोमवारी निवड चाचणी होणार असल्याचे पुणे राष्ट्रीय तालीम संघाने कळविले आहे. रविवारी सहभागी खेळाडूंची वजने वजने घेण्यात येणार आहेत. ही निवड चाचणी मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये होणार आहे.
वरिष्ठ गट गादी आणि माती विभागात ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ किलो आणि खुला गट यात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक अर्ज भरून द्यावा लागणार असून इच्छुंकानी राष्ट्रीय तालीम संघाच्या छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन संघाचे सचिव शिवाजीराव बुचडे यांनी कळविले आहे.