मुंबई : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या छत्तिसाव्या वार्षिक दीक्षान्त समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
पाच वर्षांच्या काळात कृषी विकास दर 12 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत नेणं हे अवघड काम असलं तरी अशक्य नाही आणि या कार्यात विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे.
कृषी क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. pic.twitter.com/5DRRYy3EOM
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) July 7, 2022
यावेळी माजी कुलगुरु डॉ. मोतीलाल मदान, कुलगुरु डॉ विलास भाले, कुलसचिव, शिक्षक व स्नातक विद्यार्थी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी सर्वाधिक पदके, सुवर्ण पदके तसेच इतर पारितोषिके प्राप्त करणाऱ्या स्नातकांचा सत्कार करण्यात आला.