मुंबई: काही वर्षांपूर्वी गुजराती समाजाशी पंगा घेणाऱ्या शिवसेनेने राजपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासाठी मात्र केम छो वरली! असे पोस्टर लावले आहेत. त्यामुळे शिवसेनेने राजपुत्रासाठी मराठी बाणा सोडला का असा सवाल जुन्या शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे.
#मराठी हक्कासाठी आम्ही @ShivSena
आता ‘केम छो वरली’ बोलायला लागली@AUThackeray
किती हि लाचारी
यांना वरळी चे मुख्यमंत्री नक्कीच मिळेल #शिवसेना
#म pic.twitter.com/lz47uSxKey— Digamber ? ? (@Digamber) October 1, 2019
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी सोमवारी त्यांची उमेदवारी जाहीर केली असून, आता वरळीतील गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी म्हणजेच अर्थात शिवसेनेने या पोस्टरच्या माध्यमातून केला आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणून सेनेची ओळख आहे. मात्र आता गुजराती मतांसाठी मराठी स्वाभिमान बाजूला ठेवणार का असा सवाल अनेकांकडून उपस्थित करण्यात येतोय.
@ShivSena चा वाघ आता ढोकळा खायला लागला!
उमेदवारी जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे “केम छो वरली” https://t.co/uxL34j4226
— Shreenivas Bikkad (@shreenivasab) October 1, 2019
आदित्य ठाकरेंच्या केम छो वरली या पोस्टरला नेटकऱ्यांनी मात्र चांगलंच धारेवर धरल असून, शिवसेनेचा वाघ आता ढोकळा खायला लागला, मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष असे बिरुद मिरवणारा पक्ष आता केम छो वरली म्हणतोय वा रे राजकारण, दादा काय झालं मराठीचा विसर पडला का? यासारख्या अनेक प्रतिक्रिया सोशल मिडीयावर येत आहेत.