पुणे – पुण्यातला दिघी हिल्स परिसर, आज द बॉम्बे सॅपर्सच्या सेवारत आणि माजी सैनिकांच्या पॅराजंपच्या चित्तथरारक प्रदर्शनाची साक्षीदार ठरला. बॉम्बे सॅपर्स समूहाच्या प्रतिष्ठित युद्ध स्मारकाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, सात माजी सैनिकांसह विशिष्ट 411 (स्वतंत्र) पॅरा फील्ड कंपनीचे 100 हून अधिक पॅराट्रूपर्सने पॅराशूटद्वारे उडी मारण्याची प्रात्यक्षिके सादर केली. याबरोबर संपूर्ण बॉम्बे सॅपर समूहाला एकत्र आणणाऱ्या चार वर्षांनी होणाऱ्या स्नेहसंमेलन कार्यक्रमांची सुरुवात केली.
75 वर्षांचे माजी अभियंता-इन-चीफ, लेफ्टनंट जनरल आरआर गोस्वामी यांच्या नेतृत्वाखालील माजी सैनिक द बॉम्बे सॅपर्सच्या अतुलनीय धैर्याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर झाले. यामध्ये 74 वर्षांचे ब्रिगेडियर एसआर माजगावकर, 66 वर्षांचे ब्रिगेडियर आरजी दिवेकर आणि 61 वर्षांचे माजी केंद्रीय लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल योगेंद्र डिमरी या उल्लेखनीय शौर्य प्रदर्शनात सहभागी झाले होते.