\n

न्यूझीलंडचा डाव….

\n

विजयासाठी 296 धावाचा पाठलाग करणारा न्यूझीलंडचा संघ मैदानात येताच कोसळला. त्याची सुरूवातच खराब झाली आणि त्यानंतर त्याचे फलंदाज एका मागोमाग पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. संघाने 28.1 षटके खेळली आणि त्यांना केवळ 81 धावा करता आल्या. राज लिंबानी डावाच्या पहिल्याच चेंडूवर टॉम जोन्सला (0) क्लीन बोल्ड केले. यानंतर त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्नेहित रेड्डीला (0) पायचीत (LBW) केले. लिंबानी याने पहिले षटक निर्धाव टाकले.

\n

यानंतर सौमी पांडेने जेम्स नेल्सन (10), लचलान स्टॅकपोल (5), जॅक कमिंग (16) आणि रायन सोर्गस (0) यांना बाद केले. त्याचबरोबर फलंदाजीत प्रावीण्य दाखविणाऱ्या मुशीरने गोलंदाजीमध्येही उत्कृष्टता कायम ठेवली. त्याने कर्णधार ऑस्कर जॅक्सन (19) आणि इवाल्ड श्र्युडर (7) यांच्या रूपाने दोन बळी घेतले. नमन तिवारीने ऑलिव्हर तेवतिया (7) आणि अर्शिनने ॲलेक्स थॉम्पसन (12) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

\n

Divya Deshmukh : ‘खेळ नाही, केस-कपडे-चेहरा पाहतात..’ भारतीय बुद्धिबळपटू दिव्याचे प्रेक्षकांवर गंभीर आरोप, जाणून घ्या…काय आहे प्रकरण

\n

\n

भारताचा डाव…

\n

तत्पूर्वी, सुपर सिक्स सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत आठ गडी गमावून 295 धावा केल्या. मुशीर खानने 126 चेंडूत 131 धावांची खेळी केली. तर, आदर्श सिंगने 52 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मेसन क्लार्कने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

\n

टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. अर्शीन कुलकर्णी नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आदर्शने मुशीरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 77 चेंडूत 77 धावांची भागीदारी केली. आदर्श 58 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 52 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार उदय सहारनने मुशीरसोबत 87धावांची भागीदारी केली.

\n

मोठ्या फटकेबाजीच्या प्रयत्नात उदयने आपली विकेट गमावली. तो 34 धावा करून बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. अरावेली अवनीश 17 धावा करून बाद झाला, प्रियांशू मोलिया 10 धावा करून बाद झाला, सचिन दास 15 धावा करून बाद झाला.

\n

दरम्यान, मुशीर खानने शतक झळकावले. त्याचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक ठरले. तो सध्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने चार सामन्यांच्या चार डावात 81.25 च्या सरासरीने 325 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध तीन धावा, आयर्लंडविरुद्ध 118 धावा आणि अमेरिकेविरुद्ध 73 धावा केल्या होत्या. या सामन्यात तो 126 चेंडूत 13 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 131 धावा करून बाद झाला.

\n

Jay Shah : आयसीसीच्या Chairman पदावर जय शाहची नजर, त्यासाठी देऊ शकतात ‘या’ पदाचा राजीनामा….

\n

\n

मुरुगन अभिषेक चार धावा करून बाद झाला. तर नमन तिवारी तीन धावा करून नाबाद राहिला आणि राज लिंबानी दोन धावा करून नाबाद राहिला. न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजीत मेसन क्लार्कने चार विकेट घेतल्या. तर रेयार सोर्गस, इवाल्ड श्रुडर, जॅक कमिंग आणि ऑलिव्हर टेवाटिया यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#U19WorldCup2024 #INDvNZ : सुपर-6मध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात; न्यूझीलंडचा 214 धावांनी केला पराभव…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/team-ind-u19.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/u-19-world-cup-team-india-starts-with-victory-in-super-6-defeated-new-zealand-by-214-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/team-ind-u19.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/u-19-world-cup-team-india-starts-with-victory-in-super-6-defeated-new-zealand-by-214-runs#webpage","name":"#U19WorldCup2024 #INDvNZ : सुपर-6मध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात; न्यूझीलंडचा 214 धावांनी केला पराभव…","url":"https://www.dainikprabhat.com/u-19-world-cup-team-india-starts-with-victory-in-super-6-defeated-new-zealand-by-214-runs","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/u-19-world-cup-team-india-starts-with-victory-in-super-6-defeated-new-zealand-by-214-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/team-ind-u19.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/u-19-world-cup-team-india-starts-with-victory-in-super-6-defeated-new-zealand-by-214-runs#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/u-19-world-cup-team-india-starts-with-victory-in-super-6-defeated-new-zealand-by-214-runs","name":"#U19WorldCup2024 #INDvNZ : सुपर-6मध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात; न्यूझीलंडचा 214 धावांनी केला पराभव…"}}]}}}

#U19WorldCup2024 #INDvNZ : सुपर-6मध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात; न्यूझीलंडचा 214 धावांनी केला पराभव…