मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार घेत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांनतर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे फिजिओथेरपी उपचार सुरु होते. दरम्यान आज तब्बल 22 दिवसांनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
Mumbai | Maharashtra CM Uddhav Thackeray has been discharged from the hospital after he underwent spine surgery on November 22
(file photo) pic.twitter.com/qHIyVDQ7q2
— ANI (@ANI) December 2, 2021
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी केली होती. त्यांना मान व पाठीच्या मणक्याचा त्रास होत असल्यामुळे 10 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.