पुणे – ‘जवाद’ चक्रीवादळामुळे 3 डिसेंबर रोजी धावणारी मुंबई- भुवनेश्वर- मुंबई कोणार्क एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
ईस्ट कोस्ट रेल्वेकडून ‘जवाद’ या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गांवरील रेल्वे रद्द केल्या आहेत. यामध्ये पुणे स्थानकामार्गे धावणाऱ्या कोणार्क एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे.
3 डिसेंबर रोजी सुटणारी भुवनेश्वर- मुंबई कोणार्क एक्स्प्रेस आणि मुंबई -भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वे रद्द करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले.