मुंबई – देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडवर येत्या 7 तारखेला येणार आहेत. अशी माहिती खासदार संभाजीराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
“राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि.7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.’ या आशयाचे ट्विट खासदार संभाजी राजेंनी केलं होत.
दरम्यान, देशाचे राष्ट्रपती रायगडावर येणार असल्यानं सुरक्षेच्या कारणामुळे उद्या पासून म्हणजेच, दि. 3 ते दि. 7 डिसेंबरपर्यंत पर्यटकांना किल्ल्यावर येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. खासदार संभाजी छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी स्वतः रायगडावरील तयारीचा आढावा घेतला आहे.
पोलीस दलानं सुरक्षेसाठी कंबर कसली असून, माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेत नातेगाव ते पाचड मार्ग देखील सुरक्षेसाठी पर्यटकांना बंद करण्यात आला आहे. अशी माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली आहे.