मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
विशेष म्हणजे या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी केली होती. त्या मागणीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी होकार दिल्याची घोषणा शिंदेंनी दिली आहे.
उत्तर प्रदेशातील रामजन्मभूमी अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन बांधले जाणार असल्याची घोषणा शिंदे यांनी एका कार्यक्रमात यापूर्वी केली होती. तसेच पुढील प्रक्रियेसाठी व प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली आहे.
मुंबई दौऱ्यावर असलेल्या योगींचे स्वागत राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती देऊन करण्यात आले. यावेळी उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक व गोरखपूरचे खासदार रवि किशन देखील उपस्थित होते.
उच्चर प्रदेशला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूकदारांना ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट (जीआयएस ) मध्ये आमंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा मुंबई दौरा आहे. जबाबदारी स्वीकारली आहे.