टीओडीचा 50 टक्‍के हिस्सा महामेट्रोला मिळणार

पुणे – महापालिकेच्या टीओडी झोनमध्ये अतिरिक्‍त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरताना आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्याची रक्‍कम संबंधित नियोजन प्राधिकरणाने वसूल करावी व त्यापैकी 50 टक्‍के रक्‍कम पायाभूत सुविधा सुधारणांसाठी पालिकेने स्वत:कडे ठेवावी. उर्वरित 50 टक्‍के रक्‍कम महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशनला देण्यात यावी, अशा सूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पुणे महापालिकेला दिल्या आहेत.

वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. मेट्रो मार्गालगतच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटर परिसरात टीओडी झोन दर्शवून वाढीव “एफएसआय’ देण्याची तरतूद नियमावलीत करण्यात आली आहे.
मेट्रो मार्गाच्या सरसकट पाचशे मीटरच्या परिसरात व मेट्रो स्टेशनच्या परिसरात वाढीव “एफएसआय’ द्यावा, याबाबत मध्यंतरी वाद निर्माण झाले होते. महापालिकेच्या प्रस्तावावरून मेट्रो स्टेशनच्या परिसरातच वाढीव “एफएसआय’ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यावर हरकती-सूचना मागविण्याचे आदेश दिले होते. त्यावर हरकती सूचना दाखल करण्याची आणि सुनावणी घेण्याची प्रक्रिया नगररचना विभागाकडून सुरू करण्यात आली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×