“त्यांच्या’ पाठीवर महापालिकेची थाप

पूरग्रस्तांना मदत करणाऱ्यांचा महासभेत सन्मान

पिंपरी  – सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागामध्ये जाऊन सहाय्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्था व अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान महापौर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरात शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना व महापालिकेचे अग्निशमन विभागातील कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारच्या सोयी, सुविधा उपलब्ध नसताना नैसर्गिक संकटांचा मोठया प्रमाणात सामना करत आपत्तीग्रस्त नागरिकांचे प्राण वाचवून त्यांना जीवनावश्‍यक साहित्य तसेच जनावरांना चारा पोहचवून मदत केली.

यावेळी आयुक्‍त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसचिव उल्हास जगताप, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेता नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले आदी उपस्थित होते.

मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, सब ऑफिसर प्रताप चव्हाण, ऋषिकांत चिपाडे, अशोक कानडे, नामदेव शिंगाडे, फायरमन कैलास वाघेरे, लक्ष्मण होवाळे, सरोष फुंडे, विशाल जाधव, अमोल चिपळूनकर, चेतन माने, फिटर सदाशिव मोरे, फायरमन बाळासाहेब वैद्य, अनिल माने, विकास तोरडमल, विकास नाईक, शहाजी चंदनशिवे, भरत फाळके, कैलास डोंगरे, वाहन चालक रुपेश जाधव तसेच महेशदादा स्पोर्टस्‌ फाउंडेशन, सह्याद्री सर्च ऍण्ड रेस्क्‍यू फोर्स, सुरेंद्र शळके, विजय लांडे, बाळासाहेब पाटील, संतोष शेलार, अमोल रणदिवे, बालाजी माने, निलराज माने, गितेश बांगरे, तुषार खताळ, हरपाल जाधव, सागर जांबरे, मंदार सन्नाक, संतोष सन्नाक, विवेक तापकीर, शरद महापुरे, गणेश बोऱ्हाडे, रहमान शेख, मनोज साळवे, सचिन देशमुख, सागर वाढाणे, भास्कर परांजपे, दादासाहेब नजन आदींचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)