Mahadev Jankar। लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा उद्या दुपारी होणार आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांना त्यांच्या पक्षाचे दरवाजे खुले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज जानकरांनी शरद पवार यांची भेट घेतलीय. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्यात.
अजित पवार गटातील आमदार निलेश लंके लवकरच अधिकृतपणे शरद पवार गटात दाखल होणार असल्याचे चर्चा सुरु आहेत. हे सुरु असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत काय झाले? त्याची माहिती त्यांनी दिली. महादेव जानकर हे गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून भाजपसोबत राहिले आहे.
शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघ देण्याच्या तयारीत Mahadev Jankar।
माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीत माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलाय. यामुळे हा मतदार संघ जानकर यांना देण्याच्या तयारीत शरद पवार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाविकास आघाडीची संध्याकाळी चार वाजता बैठक होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे याचा सवाल Mahadev Jankar।
दरम्यान,” मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. रिझल्ट देणारा आमदार आहे. मागील काळात मी गंगाखेड पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा रोवला, मात्र आपण मला साधा फोन करूनही कौतुक केलं नाही. मी तोंडावर बोलणारा स्पष्ट कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांना कौतुकाची अपेक्षा असते पण आपण साधा फोनही केला नाही,” असा जाब गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना विचारला.