पुणे- राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या महाविकास आघाडी पक्षातील नेत्याबाबत सोशल मीडियावर मोर्फिंग फोटो, पोस्ट टाकून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी स्वरूप प्रल्हाद भोसले (वय-३५) या आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने आठ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
याप्रकरणी नाना पंडित, वैभव पाटील, महेश गुरडले, धनंजय जोशी, जयसिंग मोहन, राजेंद्र पवार, सोनाली राणे, संदीप पाटील, अतुल आयचीत, मुकेश जाधव, शौर्यान चोरगे, राज पाटील यांच्यावर भादवी कलम ४६९, ४९९, ५००, ५०५(२), ३४ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकाश चंद्रकांत शिंदे (24,रा. कोथरूड,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फेसबुकवर राजकारण महाराष्ट्राचे, कोमट बॉईज अँड गर्ल्स, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फॅन क्लब या पेजवर, व्हाट्सउपच्या इंटलेक्चूल फोरम ग्रुपवर, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदर शरद पवार या घटनात्मक पदावर असलेल्या प्रतिष्ठित लोकांच्या राजकीय व्यक्तिमत्वाच्या लौकीकस बाधा आणण्याच्या दृष्टीने त्यांचे फोटो मोर्फिंग करून अश्लील फोटो, घाणेरड्या पोस्ट सोशल मीडियावर बदनामीकारक पद्धतीने प्रसारित करून बदनास2मी करण्याचा प्रयत्न केला.
आरोपी स्वरूप भोसले याने छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, संभाजी महाराज आणि हिंदू देवदेवता यांच्याबाबत विटंबना करणारी अश्लील चित्रे, व्हिडीओ प्रसरित केले. सरकारी वकील एल. डी.मोरे यांनी आरोपीस चार दिवस पोलीस कोठडी मागणी न्यायालयात केली. याबाबत पुढील तपास सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके करत आहे.