हडपसर – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हडपसर येथील हनुमान मंदिरात पुणे शहर बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने राज्यातील जनतेची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना देखील करण्यात आली.मुख्यमंत्र्यांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे म्हणून नाना भानगिरे यांनी हनुमान मंदिरात महाआरती करून साकडे घातले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज संकष्ट चतुर्थी निमित्त हडपसर गाव हनुमान मंदिरामध्ये महाआरती घेण्यात आली. शहराध्यक्ष प्रमोदनाना भानगिरे ,जिल्हाध्यक्ष उल्हासभाऊ तुपे यांच्या हस्ते ही महाआरती करण्यात आली .यावेळी सुरेश हडदरे, संतोष रजपूत, हनुमंत जाधव ,राहुल काळे राजू ढेबेे, शिवाजी सूर्यवंशी व राष्ट्रीय पाटील तालीम संघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हडपसर भाजी मंडईमध्ये नाना भानगिरे यांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. हडपसर भाजी मंडई पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग भवन या ठिकाणी भाजी विक्रेते व भाजी विकत घेण्यासाठी येणाऱ्या महिला भगिनी व पुरुष वर्गासाठी सुरक्षितपणे खरेदी करता यावी यासाठी स्वखर्चातून पूर्ण भाजी मंडईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत,रक्तदान शिबीरही घेण्यात आले,असे नाना भानगिरे व उल्हास तुपे यांनी सांगितले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी राज्यातील जनतेच्या हिताचे काम सातत्याने पुढे चालू ठेवले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहरात आपले काम आणि कार्य जोरदारपणे करत आहे.जनतेची सेवा करणारे, सत्तेपेक्षा सत्यावर प्रेम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून आज ही महाआरती घेण्यात आली.
प्रमोदनाना भानगिरे (शहर प्रमुख- बाळासाहेबांची शिवसेना, पुणे शहर)