बेंगळुरू – कर्नाटकातील भाजप आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव खासदार रेणुकाचार्य यांनी सरकारला मदरशांवर बंदी घालण्याची विनंती केली आहे. मदरशांमध्ये देशविरोधी कारवायांशी संबंधित गोष्टी शिकवल्या जात असल्याचा आरोप भाजप आमदाराने केला आगे. रेणुकाचार्य यांनी मदरशांच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार शाळांमध्ये शिक्षण देत असताना त्यांची गरजच काय, असा सवाल केला.
ते म्हणाले, ‘देशासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या अशा प्रसिद्ध नेत्यांबद्दल मदरशांमध्ये शिकवले जात नाही. ते तिथे फक्त इस्लाम (शिक्षण) शिकवतात. रेणुकाचार्य यांनी आरोप केला की, मदरशांमध्ये ‘देशविरोधी’ कारवायांशी जोडलेले विषय शिकवले जातात, ज्यामुळे निष्पाप मुलांच्या मनावर विपरित परिणाम होतो.
हिंदू धार्मिक संस्था आणि मठांसाठी निधी उपलब्ध नसल्याचा आरोप करून त्यांनी मदरशांना आर्थिक मदत जाहीर केल्याबद्दल सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवरही टीका केली. कर्नाटकातील भाजप आमदाराचे हे वक्तव्य अशावेळी आले आहे, जेव्हा हिजाबच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये परीक्षेदरम्यान हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आली आहे.