मध्य प्रदेशचे शालेय शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाजापूर जिल्ह्यात ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांची 22 वर्षीय सून सविता परमार हिने सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गळफास लावून घेतला. सविताच्या कुटुंबीयांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.
सविताचे लग्न तीन वर्षांपूर्वी इंदरसिंग परमार यांचा मुलगा देवराजसोबत झाले होते. या संदर्भात मंत्र्यांचे कुटुंबीय बोलण्यास टाळा-टाळ करत आहेत. पोलिसही सध्या गप्प आहेत. घटनेच्या वेळी मंत्री परमार भोपाळमध्ये होते, तर मुलगा देवराज मोहम्मदखेडा येथे एका कार्यक्रमासाठी गेला होता. पुढील तपास पोलीस करत आहेत.