Mallikarjun kharge On modi Sarkar : भारतीय जनता पार्टी देशाची घटना संपुष्टात आणण्याचे काम करते आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की देशाचे संविधान सुरक्षित आहे तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे खासदार संविधान बदलणार असल्याचे सांगतात अशी टीका करतानाच भाजप कायमच सामाजिक न्यायाच्या विरोधात राहीला आहे. धर्मनिरपेक्षतेलाही या पक्षाचा विरोध आहे असा आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
मोदी यांच्यात जर धाडस असेल तर त्यांनी अशा लोकांना पक्षातून बाहेर काढले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंकण्याच्या गोष्टी मोदी आता करत आहेत. हे सगळे घटना बदलण्यासाठी आहे का असा सवालही खर्गे यांनी केला. | Mallikarjun kharge On modi Sarkar
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तिरंग्याला जेवढा मान देत नाही तेवढे महत्व भगव्या ध्वजाला देतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. इलेक्टोरल बॉंडच्या संदर्भात स्टेट बँकेने सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत मागितली आहे. | Mallikarjun kharge On modi Sarkar
याचा अर्थ मोदी सरकार काही कृत्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यातून स्पष्ट होते. एवढ्या मुदतीची गरज का आहे? सरकार निवडणूक होईपर्यंत सत्य लपवू पाहते आहे असा आरोप देखील खर्गे यांनी केला. | Mallikarjun kharge On modi Sarkar