नवी दिल्ली – एलपीजी सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्याच्या केंद्राच्या घोषणेचे मी स्वागत करतो, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास ही किंमत वाढवली जाणार नाही याची हमी देतील काय असा सवाल ज्येष्ठ कॉंग्रेस नेते चिदंबरम यांनी केला आहे. पंतप्रधानांनी तामिळनाडुसाठी हजारो कोटी रूपयांच्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या आहेत, परंतु त्यासाठी अर्थसंकल्पात काही तरतूद करण्यात आली आहे काय असा सवालही त्यांनी केला आहे.
काँग्रेसचे राज्य मुख्यालय असलेल्या सत्यमूर्ती भवन येथे पत्रकारांशी बोलताना चिदंबरम म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील युवकांना पाच हमी दिल्या आहेत आणि त्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात निवडणूक समाविष्ठ केल्या जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी सत्तेवर आल्यास या गोष्टी पूर्ण होतील,” असे पक्षाच्या निवडणूक जाहीरनामा समितीचे प्रमुख चिदंबरम म्हणाले.आश्वासनांबद्दल सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की, स्पर्धा परिक्षेच्या प्रश्न पत्रिका फुटल्यास पीडितांना आर्थिक नुकसान भरपाई मिळू शकेल आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी जलदगती न्यायालयात खटलाही चालेल.
पंतप्रधानांकडून विविध प्रकल्पांच्या घोषणा केल्या जात आहेत त्या विषयी बोलताना चिदंबरम म्हणाले की, २२ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत पंतप्रधानांनी तामिळनाडूसाठी १७,३०० कोटी रुपयांसह देशासाठी ५.९० लाख कोटी रुपयांहून अधिक प्रकल्पांची घोषणा केली आहे पण केंद्रीय अर्थसंकल्पात मला यासाठीची कोणतीही आढळत नाही. या घोषणा कागदी फुलासारख्या कुचकामी आहेत असे ते म्हणाले.
एका प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले की, केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी फारसे काही केले नाही. “केंद्रात काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यास अग्निपथ योजना रद्द केली जाईल आणि सशस्त्र दलात भरतीची पूर्वीची प्रणाली पुनर्संचयित केली जाईल,” असे काँग्रेस नेते म्हणाले.