बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने “देवदास’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला 18 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कोरिओग्राफर सरोज खानने तिच्या कारकिर्दीतील एक उत्कृष्ट नृत्य सादर केल्याची आठवण करून दिली. या चित्रपटावेळीच्या आठवणींना उजाळा देत माधुरीने इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली, ज्यात तिने सांगिले की दिवंगत कोरिओग्राफर यांनी “मार डाला’ गाण्यासाठी कसे तयार केले.
माधुरी म्हणाली, “देवदास’ चित्रपटाने 18 वर्षे पूर्ण केल्यानिमित्त मी या चित्रपटात माझ्या सर्वोत्कृष्ट नृत्य अभिनयामागील सामर्थ्य मिळविण्यासाठी सरोजजी यांना समर्पित करते.”
सरोजजी यांच्यासमवेत कोणत्याही गाण्याचे चित्रीकरण करताना खूप मजा आली. “देवदास’ हा एक विशेष चित्रपट होता. कारण या चित्रपटातील सर्व गाणी खूपच भव्य होती. पण, त्यांच्यासोबत मी असे कोणतेही गाणे केले नव्हते. आम्ही एकत्रितपणे अनेक भारतीय गाण्यांवर काम केले होते, परंतु यासारखे क्लासिकल नव्हते आणि सरोजजी सेमी-क्लासिकत डान्सर होती. त्या म्हणायच्या की, ही थोडी कथक शैली आहे. आज त्या आपल्यात नाही, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सदैव आपल्या आठवणीत राहतील.