मुंबई – अभिनेत्री माधुरी दीक्षित नेहमीच स्लिम फिट लूकमध्ये दिसते. माधुरी सोबतच्या अनेक अभिनेत्री अनफिट दिसून येतात. परंतु माधुरी नेहमीच फिट असते. माधुरीप्रमाणे तिचा पती श्रीराम देखील फिटनेसची पूर्ण काळजी घेत असल्याचे दिसून येते. नुकतंच श्रीराम नेने यांचा एक जिममधील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
माधुरीच्या फिटनेसचे तर सर्वच जण कौतुक करतात पण यावेळी तिचा पती श्रीराम नेने यांचं देखील नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. नेने यांचा जिममधील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते शर्टलेस होऊन आपली बॉडी दाखवताना दिसत आहेत. एव्हडेच नाही तर यावेळी एखाद्या बॉडी बिल्डरप्रमाणे ते दोन्हही हात खाली करून पोझ देताना दिसत आहेत.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी यावेळी त्यांच्या फिटनेसचे चांगले कौतुक केले आहे. तुम्ही दोघेही ‘मेड फॉर इच अदर’ आहात असं एका युजरने म्हंटल आहे तर दुसऱ्याने माधुरी इतके तुम्ही सुंदर नाहीत पण फिट आहेत असा टोमणा देखील लगावला आहे. डॉक्टर नेने यांनी स्वतः हा व्हिडीओ आपल्या इंस्टावर पोस्ट केला आहे.