संजय लीला भन्साळी “हिरा मंडी” नावाचा सिनेमा करणार आहे. त्यासाठी सध्या कलाकारांची निवड केली जात आहे. आतापर्यंत समजलेल्या माहितीनुसार “हिरा मंडी”मध्ये आलिया भट लीडरोलमध्ये असणार आहे.
तिच्याशिवाय बॉलिवूडमधील अन्य काही हिरोइन भसाळी आपल्या सिनेमांमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. ऐश्वर्या राय-बच्चन, दीपिका पदुकोण, माधुरी दीक्षित, परिणीती चोप्रा यांच्याशी चर्चा सुरू आहे.
यापैकी किमान दोघीजणी तरी आलियाच्याबरोबर या सिनेमात असतील. ऐश्वर्या, माधुरी आणि दीपिकाने यापूर्वी संजय लीला भन्साळीच्या सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांना भन्साळी बरोबर काम करायला काहीच प्रॉब्लेम असणार नाही. या तिघी जणी पण भन्साळीच्या प्रोजेक्टला सहकार्य करतील अशी खात्री आहे.
“हिरा मंडी”चे डायरेक्शन विभू पुरी करणार आहे. विभू पूर्वी पूर्वी भन्साळीचे सहाय्यक होते. “हिरा मंडी” हा सिनेमा लाहोरमधील रेड लाईट एरियावर आधारित असेल. रेड लाईट एरियातील महिलांच्या जीवनावर हा एक प्रकाशझोत टाकणारा “हिरा मंडी” नेटफ्लिक्स वर रिलीज होणार आहे.