मुंबई – माधुरी दीक्षितचा ओटीटी डेब्यू चित्रपट ‘मजा मा’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. माधुरी या चित्रपटात एक परिपूर्ण आईच्या भूमिकेत दिसत आहे, जी बिनधास्त आणि आपल्या कुटुंबासाठी मेहनती आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले असून सुमित बठजाने यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.
ट्रेलरमध्ये माधुरी दीक्षित एक आनंदी कौटूंबिक जबाबदारी सांभाळणारी महिला दाखवली आहे. चित्रपटाची कथा पूर्णपणे माधुरीभोवती फिरते. मुलीची इंगेजमेंट तुटण्यापासून माधुरी आपल्या कुटूंबावर आलेल्या संकटाला कशी सामोरी जाते हे या चित्रपटातून पाहता येणार आहे. 6 ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट प्रसारित केला जाईल.
चित्रपटात माधुरी आईच्या भूमिकेत असली तरी तिने आपल्या अभिनयासह लुक्स ने कमालीचा प्रभाव चित्रपटावर पाडल्याचे ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. प्राइम व्हिडिओवर रिलीज होणाऱ्या या चित्रपटात गजराज राव, रित्विक भौमिक, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, सिमोन सिंग, शीबा चढ्ढा आणि निनाद कामत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.