Madhuri Dixit – डायरेक्टर सूरज बडजात्याचा ‘हम साथ साथ है’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात जॉइंट फॅमिली दाखवण्यात आली होती,यामुळे भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. चित्रपटात सलमान खान, सैफ अली खान, मोहसीन बहल, तब्बू. यात सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर आणि नीलम कोठारी महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.
या चित्रपटाबाबत आता आता माधुरी दीक्षितने खुलासा केला आहे. या चित्रपटाची माधुरीला ऑफर आली होती. यापूर्वी सलमान-माधुरीची जोडी हम आपके है कौनमध्ये मध्ये दिसली होती. ही जोडी पुन्हा एकदा ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात दिसणार होती. मात्र माधुरीनेया चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
याबाबत माधुरीने एका मुलाखतीत खुलासा केला की, सलमान खानमुळे तिने ‘हम साथ साथ है’मध्ये काम करण्यास नकार दिला होता. माधुरीने सांगितले की,’तिला हम साथ साथ है ऑफर करण्यात आली होती. सूरज बडजात्याने तिला या चित्रपटात रोल ऑफर केला होता. तिला तब्बूची भूमिका ऑफर करण्यात आली होती. या चित्रपटात तब्बूने साधनांची भूमिका साकारली होती. माधुरीने सांगितले होते की ती करिश्मा आणि सोनालीच्या भूमिका करू शकली असती पण सूरज यांना वाटले की ती त्याच्यासाठी योग्य नाही.’ तसेच या चित्रपटात एका सीनमध्ये सलमान आणि माधुरीचे नाते बहीण भावाचे दाखविण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षकांना हे आवडणार नाही असे तिला वाटले.
माधुरीने पुढे सांगितले की, ‘हम आपके है कौन’मध्ये सलमान खानच्या मैत्रिणीची भूमिका साकारल्यानंतर तिला भाभीची भूमिका साकारणे कठीण जाईल असे वाटले. प्रेक्षकांना हे आवडणार नाही असं माधुरीला वाटत होतं. त्यामुळे तिने हा चित्रपट नाकारला.’ असे तिला वाटत होते.