मुंबई – अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) काम जोरात सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी 2024 ला मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहेत. या दिमाखदार सोहळ्यासाठी देशभर तयारी सुरु आहे. लाखो नागरिक अयोध्येत एकत्र येऊन गर्दी करण्याचीदेखील शक्यता आहे.या सोहळ्यासाठी सिने कलाकार अमिताभ बच्चन साऊथ स्टार चिरंजीवी यांच्यासह अनेक कलारांना निमंत्रण देण्यात आले आहे.
अयोध्येतील हा सोहळा भव्य-दिव्य स्वरूपात होणार असल्याचे संकेत आधीपासूनच मिळत आहेत. त्या सोहळ्याचे निमंत्रण अनेक कलाकारांना देण्यात आल्याची माहिती देखील समोर आलिया आहे.
सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, रजनीकांत, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष, रिषभ शेट्टी आदींना निमंत्रण पाठवण्यात आल्याचे वृत्त याआधी होते. आता ऐतिहासिक ठरणाऱ्या सोहळ्यासाठी इतरही अनेक कलाकारांना निमंत्रण देण्यात आल्याचे समजते. त्यामध्ये प्रामुख्याने सनी देओल, अजय देवगण, रणबीर कपूर, आलिया भट्ट, प्रभास, यश, टायगर श्रॉफ, आयषुमान खुराणा अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.
राम मंदिराचे काम सुरु
भव्य राम मंदिर (Ram Mandir) निर्माणकार्य सध्या प्रगती पथावर आहे. राम मंदिरामध्ये एकूण 42 दरवाजे बसवण्यात येणार आहेत. मंदिराच्या गर्भगृहातील सोन्याच्या दरवाज्यावर सुंदर मोर, चक्र आणि फुलांचे नक्षीकाम करण्यात येत आहे. तसेच, इतर लाकडी दरवाज्यांवरही सुंदर नक्षीकाम केले आहे.