नवी दिल्ली – नेपाळमधील सरकारचे भवितव्य धोक्यात असताना पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अजब दावा केला आहे. भगवान राम भारतीय नाही तर नेपाळी असल्याचा दावा केपी शर्मा ओली यांनी केला आहे. या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला आहे.
Real Ayodhya lies in Nepal, not in India. Lord Ram is Nepali not Indian: Nepali media quotes Nepal Prime Minister KP Sharma Oli (file pic) pic.twitter.com/k3CcN8jjGV
— ANI (@ANI) July 13, 2020
केपी शर्मा ओली यांनी म्हंटले कि, खरी अयोध्या भारतात नव्हे तर नेपाळमध्ये असून भगवान राम भारतीय नाही तर नेपाळी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यानंतर नेपाळमधील माजी उपपंतप्रधान कमल थापा यांनी वक्तव्याचा निषेध केला असून कोणत्याही पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीचे असे निराधार आणि पुरावे नसलेले वक्तव्य करणे योग्य नाही. भारत आणि नेपाळचे संबंध पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना खराब करायचे आहेत, असे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसून येत आहे. त्यांनी असे न करता दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, भारतविरोधी वक्तव्याबद्दल नेपाळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक पक्षांतर्गत विरोधकांनी केपी शर्मा ओली यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. तर पंतप्रधान ओली यांची खुर्ची कायम राहावी यासाठी चीन प्रयत्नशील आहे. चीनचे नेपाळमधील राजदूत होऊ यॉंकी हे यासाठी चीनच्या राजकारणात सतत हस्तक्षेप करीत असल्याचे सध्या दिसून येत आहे.